बेळंकी : महावितरण कंपनीच्या वतीने बेळंकी येथे कालपासून नवीन स्मार्ट मीटर बसविण्यास सुरुवात केली आहे. ही बाब समजताच गावातील सजग तरुणांनी एकत्र येत यास तीव्र विरोध केला होता. त्यानंतर हे काम थांबवले होते. आता आज ग्रामपंचायत येथे होणाऱ्या बैठकीत कंपनीचे प्रतिनिधी या मीटरबाबत ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत व आपली भूमिका ही मांडणार आहेत. या बैठकीतही स्मार्ट मीटर वर जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.
ग्रामपंचायत मध्ये सकाळी ११ वाजता ही बैठक होणार आहे. या वेळी कंपनी चे प्रतिनिधी या मीटर बाबत ग्राहकांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन करणार आहेत. मात्र, तरीही हे मीटर बसविण्यास तरुणांनी विरोध दर्शवला आहे. बैठकीत यावर जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.