सांगली : इरादा न्यूज नेटवर्क
केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार शेतकऱ्यांसाठी आता ओळखपत्र काढणे बंधनकारक करण्यात आले आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेतून हे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे २० व्या हप्त्यापासून नवीन नियम लागू होणार असून, ज्यांच्याकडे शेतकरी ओळखपत्र नाही त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. यासह शेतकऱ्यांना आपल्या कुटूंबातील सर्वांचे आधारकार्ड आता लिंक करावे लागणार आहे. पीएम किसान योजनेचे १९ वा हप्ता नुकताच जमा करण्यात आला आहे. त्यामुळे आता २० वा हप्ता मिळवण्यासाठी ही नोंदणी आवश्यक असणार आहे. नव्याने नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी पती, पत्नी आणि १८ पेक्षा कमी वयाच्या कुटूंबातील सदस्यांचीही माहिती भरावी लागणार आहे. नियमांचे पालन न
करणाऱ्यांना निधी देणार नाही. राज्य सरकारच्यावतीने शेतकऱ्यांना अॅग्रीस्टॅक योजनेतून नोंदणी सुरु करण्यात आली आहे.