सांगलीचे नवे जिल्हाधिकारी म्हणतात…प्रशासकीय कामात…

0
14

सांगली : इरादा न्यूज नेटवर्क

सांगलीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून अशोक काकडे यांनी आज पदभार स्वीकारला. सांगलीत यापूर्वी काम केल्याने त्या जोरावर उत्कृष्ट काम करता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी जिल्ह्यात प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणत असताना लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार . तसेच, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास प्राधान्य देणार आहे, अशी ग्वाही जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली.
मावळते जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याकडून काकडे यांनी आज पदभार स्वीकारला. त्यानंतर ते बोलत होते. आपणास सांगलीतील कामाचा पूर्वानुभव आहे., जिल्हाधिकारी पदाच्या कार्यकालात अधिक चांगले काम करू, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात नूतन जिल्हाधिकारी काकडे यांचे सर्व विभाग प्रमुखांनी स्वागत केले. काकडे यांनी यापूर्वी सारथी , पुणे येथे व्यवस्थापकीय संचालक या पदावर कार्यरत होते. काकडे हे सन 2010 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहेत. श्री. काकडे यांनी यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी, नांदेड, महिला व बालकल्याण आयुक्त, पुणे येथे म्हाडाचे संचालक या पदांवर काम केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी सन 2003 ते 2006 या कालावधीत निवासी उपजिल्हाधिकारी या पदावर सांगलीत काम केले आहे.

————————————————–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here