दोघांची महसूल सहायकपदी निवड

बेळंकी : इरादा न्यूज नेटवर्क
बेळंकी येथील इरादा वाचन मंदिरचे विद्यार्थी मयूर पुरीबुवा आणि तेजश्री जाधव यांची एमपीएससीच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेतून महसूल सहायक या पदावर नेमणूक झाली आहे. +ग्रामीण भागातील मुलांना इरादा संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या या सुविधेचा लाभ घेऊन मुले सरकारी सेवेत येत असल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
एमपीएससी कडून हि परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा आज निकाल लागला त्यात दोघांनी यश मिळवले. मयूर पुरीबुवा याची यापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागातही निवड झाली आहे. आता पुन्हा त्याला यश मिळाले आहे. इरादा सामाजिक संस्थेकडून उपलब्ध सुविधेचा लाभ घेऊन बेळंकी आणि परिसरातील तरुण शासकीय सेवेत दाखल होत आहेत