सांगली : इरादा न्यूज नेटवर्क : नैसर्गिक आपत्तीवेळी शेतकऱ्यांना सहाय्यभूत ठरणाऱ्या पिकविमा योजनेबद्दल एक बातमी आहे. या योजनेत गैरप्रकार होत असल्याचा ठपका ठेवत ही योजना बंद करण्याची शिफारस एका समितीने राज्य सरकारकडे केली आहे. या समितीने केलेल्या शिफारशी स्विकारल्यास ही योजना बंद होणार आहे. या योजनेतून शेतकऱ्यांचा विमा हप्ता सरकारच भरत होते त्यामुळे केवळ एक रुपयाच शेतकऱ्यांना द्यावा लागत होता. आता ही योजनाच बंद होणार असल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, कृषी आयुक्त आणि त्यांच्या नियंत्रणाखालील एका समितीने १ रुपयांत पिकविमा योजना बंद करुन त्याऐवजी १०० रुपये भरावेत अशीही शिफारस केली आहे.

या योजनेत गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. त्यात सांगली जिल्ह्यात १७ हजार २१७ बोगस अर्जदार आढळून आले आहेत.