‘या’ गावातील 24 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा!

0
31

सांगली : इरादा न्यूज नेटवर्क

विटा शहरातून एक बातमी अशी आहे की शहरातील शासकीय निवासी शाळेतील 24 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. विद्यार्थ्यांना उलटी, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास सुरु झाल्यानंतर तातडीने सर्वांना विटा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार सुहास बाबर यांनी रुग्णालयाला भेट देवून विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. विटा शहरात साळशिंगे रस्त्यावर असलेल्या शासकीय निवासी शाळेत सध्या ९३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. रविवारी विद्यार्थ्यांना पहिल्यांदा आहारात मांसाहार तर नंतर दुध, कलिंगड व रात्री चपाती, आमटी देण्यात आली होती. जेवणानंतर काही वेळाने विद्यार्थ्यांना त्रास जाणवू लागला. त्यानंतर सर्वांना तातडीने उपचारासाठी विटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आहे. सर्वांवर उपचार सुरु आहेत.

सुरज प्रकाश जाधव ( वय १६ ), श्रवणकुमार विठ्ठल बागडे ( वय १७ ), सुरज किसन साठे ( वय १५ ), आदित्य आनंदा रोकडे ( वय १६ ), निर्मल किशोर सावंत (वय १४ ), स्मित सुभाष झिमरे ( वय १२ ), योगेश बिरुदेव मोटे ( वय १३ ), शुभम प्रकाश माळवे ( वय १४ ), हर्षवर्धन सुनील गायकवाड ( वय १३ ), तेजस सचिन काटे ( वय १५ ), आदित्य कैलास लोखंडे ( वय १६ ), आरूष संजय सकट ( वय १२ ), यश विजय सकट ( वय १२ ), श्रीवर्धन प्रवीण माने ( वय ११ ), प्रज्वल शशिकांत शिंदे ( वय १६ ), सिद्धार्थ जित्ताप्पा बनसोडे ( वय १३ ), आयुष नामदेव सावंत ( वय १३ ), तन्मय प्रकाश निकाळजे ( वय १४ ), सक्षम दिनकर सुखदेव
( वय १४ ), संदीप सुदर्शन नातपुते ( वय १४ ), प्रणव सुर्यकांत उबाळे ( वय १६ ), अभिषेक गौतम डोळसे ( वय १२ ), चैतन्य शशिकांत शिंदे ( वय १२ ), सक्षम तानाजी चंदनशिवे ( वय १२ ) अशी त्यांची नांवे आहेत.

————————————————

अशाच महत्वपूर्ण बातम्या मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रुपमध्ये , त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 7058323434

“इरादा टाईम्स” च्या बातम्या मिळविण्यासाठी 7058323434 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Irada Times वर. ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, यासाठी वाचत रहा…. सर्वात विश्वासार्ह इरादा टाईम्स.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here