सांगलीच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांतदादा पाटील

0
18

मुंबई : गेल्या पंधरवड्यापासून चर्चा सुरु असलेल्या पालकमंत्री पदाची घोषणा अखेर करण्यात आली आहे. त्यात सांगलीच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांतदादा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी झालेल्या चर्चेनुसार पालकमंत्रीपदी शंभूराजे देसाई यांचे नाव चर्चेत होते. मात्र, शनिवारी घोषणा झाली त्यात साताऱ्याची जबाबदारी देसाई यांना देण्यात आली आहे. विद्यमान मंत्रीमंडळात सांगली जिल्ह्यातील एकाही आमदाराची मंत्रीपदी वर्णी लागली नसल्याने बाहेरचेच मंत्री पालकमंत्री होणार हे निश्चित होते.

चंद्रकांतदादा पाटील यांनी यापूर्वीही सांगलीची जबाबदारी संभाळली आहे. आता पुन्हा एकदा ते पालकमंत्री म्हणून काम करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी स्वतःकडे घेतली आहे तर सध्या चर्चत असलेल्या बीडची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्विकारली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणेसह मुंबई शहरची जबाबदारी असणार आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रुपमध्ये , त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 7058323434

“इरादा टाईम्स” च्या बातम्या मिळविण्यासाठी 7058323434 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Irada Times वर. ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, यासाठी वाचत रहा…. सर्वात विश्वासार्ह इरादा टाईम्स.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here