मुंबई : मुख्यमंत्री म्हणून सुत्रे स्विकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामास सुरुवात केल्यानंतर धोरणात्मक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे मंत्रीमंडळाच्या विस्ताराला विलंब लागला असलातरीही त्यानंतर मंत्रीमंडळही आता कार्यरत झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक आदेश प्रशासनाला दिला आहे. ज्या आदेशाची आता सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. त्या आदेशानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यातील कोणत्याही दौऱ्यात स्वागतासाठी बुके आणू नयेत असे सूचीत करण्यात आले आहे. याशिवाय पूर्वीपासून चालत असलेल्या पोलिसांच्या मानवंदनेलाही त्यांनी बगल दिली असून, हे दोन्ही पध्दती करु नये अशी सुचनाच देण्यात आली आहे.

शासकीय प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री यांच्या स्वागतासाठी सर्व विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित असतात. यावेळी प्रत्येक अधिकाऱ्यांकडून बुके देण्यात येतो. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री सचिवालयाकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचनापत्र पाठवून तत्काळ अंमलबजावणीचेही आदेश दिले आहेत. त्यानुसार मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यावेळी कोणतेही अधिकारी पुष्पगुच्छ आणणार त्यात म्हटले आहे. नाहीत आणि पोलिस दलाच्यावतीने देण्यात येणारी मानवंदना मुख्यमंत्री सूचनेनुसार बंद करण्यात आल्याचे यांच्याच सूच
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या आदेशाची आज समाजमाध्यमावर जोरदार चर्चा सुरु होती.