हैदराबाद : हैदराबादी येथे सुरू असलेल्या भारत आणि बांगलादेश यांच्या टी २० सामन्यात भारतीय संघाने विक्रमी धावसंख्या उभारली आहे. एसटी रक्षक फलंदाज संजू सॅमसन याने धडाकेबाज शतक केले. कर्णधार सूर्यकुमार यादव याने अर्धशतक झळकावले तर हार्दिक पांड्या आणि रेहान पराग यानेही बांगलादेशी गोलंदाजांची धुलाई केली. आणि 20 ओव्हर मध्ये 297 धावांचा डोंगर उभारला.