थंडीची लाट : काय करावे, काय करू नये मार्गदर्शक सूचना

0
17

सांगली : थंडीच्या लाटेसंदर्भात करावयाच्या उपाययोजनांबाबत शासनाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या असून, संभाव्य आपत्तीमध्ये मृत्यू दर शून्य राहण्यासाठी सर्वांनी आपल्या स्तरावर खबरदारी घ्यावी. तसेच मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

 यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे –

        थंडीची लाट येण्यापूर्वी – हिवाळ्यामध्ये वापरण्यासाठी लोकरीचे कपडे खरेदी करावेतरात्री पांघरण्यासाठी चादरघोंगडीरग असे सर्वांना पुरतील याची काळजी घ्यावी. नसल्यास त्याची खरेदी करून ठेवावी. आपत्कालीन उपाय योजना तयार ठेवावी.

            थंडीची लाट आल्यानंतर (दरम्यान)   शक्य तितके घरी रहावे.थंड हवेमध्ये प्रवास टाळणे किंवा कमी करणे आवश्यकशरीरातील उष्णता कमी होऊ नये यासाठी गरम कपडे वापरावेओले कपडे तात्काळ काढून टाकावे, अंग कोरडे ठेवावेगरम पेय घ्यावे, थंड किंवा फ्रीज मधील पेय टाळावेवृध्द व्यक्ती व लहान मुलांची जास्त काळजी घ्यावी, लक्ष द्यावेवर्तमान पत्ररेडिओ यावरील बातम्या वाचणे / पहाणेथंडीमुळे कानाच्या पाळ्यानाकाचे टोककिंवा हाताची बोटे पांढरी फिकट दिसू लागल्यास किंवा शरीरातील तापमान कमी झाल्यास भरपूर उबदार कपड्यांनी पांघरून घ्यावे, गरम पेय घ्यावे, मद्य देऊ नये त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते, थंडीमुळे हुडहुडी किंवा अंग थरथरत असेल तर वैद्यकीय मदत घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here