अशी घ्या दातांची काळजी

0
21

समाजामधील अर्ध्याहून अधिक लोकांच्या तोंडाचे आरोग्य व्यवस्थित नसते, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.आम्ही नियमितपणे दात घासतो, म्हणजे आमचे मौखिक-आरोग्य उत्तम आहे, असे सर्वाना वाटत असते मात्र हा गैर समज आहे. 

मौखिक आरोग्याविषयीच्या लोकांच्या बेफिकीरीचा तोटा त्यांना स्वतःलाच होत असतो. एवढ्या मोठ्या संख्येच्या देशामधील लोक आपल्या तोंडाच्या आरोग्याबद्दल निष्काळजी  दिसून येतो. मौखिक आरोग्य बिघडण्यास तशी अनेक कारणे आहेत, मात्र आयुर्वेदिय पद्धतीने दंत धावन न करता आधुनिक टुथपेस्ट्सचा वापर हे त्यामागचे एक मुख्य कारण असावे अशी शंका येते.

दात घासताना ब्रश दातांवरुन आडवा न फिरवता उभा ( वर-खाली) हळुवारपणे फिरवा. त्याशिवाय ब्रश दातांवरुन गोलाकार गतिने हळूवार फिरवणे, दातांच्या फटींच्या कडेने दात वर-खाली घासणे, दातांच्या फटींमधील अन्नाचे कण ब्रशच्या केसांनी प्रयत्नपुर्वक हळुवारपणे काढणे अशाप्रकारे दात घासायला हवे. दातांच्या चारही कोप-यातून ब्रश व्यवस्थित फिरवा. वरच्या रांगेतले मागचे दात व अगदी कोप-यातल्‍या दात आणियांकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. सकाळी व रात्री झोपण्यापुर्वी दात घासलेच पाहिजेत, तर मुलांनी सायंकाळीसुद्धा घासणे योग्य. महत्त्वाचं म्हणजे ब्रश दातांवर जोरात दाबू नका, अलगद फिरवा आणि हो, मऊ केसांचा ब्रश वापरा. आत म्हणजे टॉयेलटची टाईल्स नाही जी कडक केसांच्या ब्रशने कशीही घासता येईल. टुथपेस्टमधील केमिकल्सचे प्रमाण पाहता अगदी वाटाण्याच्या आकाराऐवढीच पेस्ट ब्रशवर घ्या, केमिकल्सविरहित वापरलीत तर उत्तम, पण दात नीट घासा आणि व्यवस्थित चूळा भरा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here