नवीदिल्ली : आपघातामध्ये फक्त लाईट मोटर वाहन परवाना असणाऱ्या वाहन चालकांना दोषी ठरवले जाऊ शकत नाही. दुर्घटनेची इतरही कारण अशी टिपणे करत सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या संविधान पिठाने एक निर्णय दिला आहे.. आता लाईट मोटर वाहन परवानाधारक साडेसात हजार किलो वजनाचे हलके ट्रान्सपोर्ट वाहन देखील चालू शकणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या संविधान पिठाने 2017 चा आपला निर्णय कायम ठेवलेला आहे. यामध्ये एल एम व्ही परवानाधारकांना साडेसात हजार किलोग्रॅम पर्यंत परवाना वाहन चालवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. म्हणजेच काय तर हलकी वाहन चालवण्याचा परवाना असणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
चालकांना 7500 किलोग्राम वजनाचं कमर्शियल वाहन चालवण्याचा अधिकार आहे की नाही या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलाय. त्यामुळे वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे.