पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेत मार्फत घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता अर्थात टीईटी परीक्षा येत्या रविवारी सर्वत्र पार पडणार आहे या परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे.
प्रशासनाने केलेल्या नियोजनानुसार सर्व ठिकाणी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे. त्यानुसार सर्व वर्ग खोल्यांमध्ये तब्बल 18000 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. या कॅमेर्यांचे थेट प्रक्षेपण परीक्षा परिषदेच्या नियंत्रण कक्षात अर्थात वॉर रूम मध्ये होणार आहे. ए आय वर आधारित अत्याधुनिक सेवा कार्यान्वित केल्याने वर्ग खोल्यांमधील प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.
राज्य परीक्षा परिषदेतर्फे टीईटी 2024 ची परीक्षा एकूण 1023 केंद्रांवर होणारे परीक्षेतील एकूण तीन लाख 53 हजार 952 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. एक लाख 52 हजार 605 पेपर दोन साठी एक लाख 347 आणि दोन्ही पेपर साठी 75 हजार 996 विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. ही परीक्षा संवेदनशील असल्याने योग्य खबरदारी घेतल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे आणि आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली.