पुणे : इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा यापूर्वी ठरलेल्या वेळापत्रकाच्या 10 दिवस अगोदर घेतली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने निश्चित केलेले अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडथळा येऊ शकतो.
या संदर्भात बोर्डाने निवडणूक आयोगाकडे विचारणा केली तिथून परवानगी मिळाल्यानंतर काही दिवसात वेळापत्रक जाहीर होईल अन्यथा निवडणुकीनंतर असते जाहीर केले जाणार आहे. बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारीपासून तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यांचे प्रात्यक्षिक परीक्षा पार पडणार आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी सर्वच केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि सरमिसळ पद्धत अवलंबली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांनी तात्पुरते परीक्षा वेळापत्रक जाहीर केल्यावर त्यावर हरकती मागवल्या होत्या. त्या संदर्भात केवळ 40 हरकती प्राप्त झाल्या होत्या त्यामुळे बोर्डाने तेच वेळापत्रक अंतिम केले आहे. आता फक्त दहा दिवस अलीकडे होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक आचारसंहितेत प्रसिद्ध करता येईल का यावर मार्गदर्शन घेण्यात येणार असून त्यानंतर पुढील निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. आचार संहिता काही अडथळा नसल्यास काही दिवसात ते जाहीर होईल दुसरीकडे परीक्षा दहा दिवस अलीकडे घेतल्यामुळे कोणते अडचणी येऊ शकतात याबाबत ही विचार केला जात असल्याचे समजते.