विश्वजीत कदम, विशाल पाटील, जयश्री पाटील यांच्यात चर्चा

0
25

सांगली :  सांगली विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अधिक रंगतदार होत असून महायुती आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारा विरोधात अपेक्षा दंड थोपटले आहेत. महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील यांनी बंडखोरी करण्याचा इशारा दिला होता. याबाबत त्यांचे कार्यकर्तेही आक्रमक  झाले होते. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी जयश्रीताई पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांना विधान परिषदेवर पाठविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तरीही यावेळी निवडणूक लढवणारच असा इरादा त्यांनी व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर खासदार विशाल पाटील आणि माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी जयश्रीताई पाटील यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. बंद द्वार  झालेल्या या भेटीदरम्यान काय चर्चा झाली याबद्दल तपशील अद्याप समजू शकला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here