मुंबई : भारतीय संघासाठी न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची कसोटी मालिका अपेक्षाभंग करणारी ठरली आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर सध्या मुंबई येथे सुरू असलेल्या कसोटीतही टीम इंडियाचा पहिला डाव २६२ धावांवर संपुष्टात आला. या मालिकेत प्रथम बंगळुरु कसोटी आणि नंतर पुण्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते.
मुंबई कसोटीत मात्र दुपारनंतरच्या गावात भारताच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. न्यूझीलंड कडे सध्या अवघ्या 143 धावांची आघाडी आहे. तर त्यांचे नऊ फलंदाज तंबूत परतले आहेत. मुंबई येथील खेळपट्टी फिरकीला अनुकूल असल्याने उद्या भारतीय फलंदाज न्यूझीलंडच्या फिरकी समोर कसे तग धरतात यावर विजय अवलंबून असणार आहे. तरीही भारताच्या विजयाची शक्यता आता वाढली आहे. फिरकीला साथ देणाऱ्या वानखेडे स्टेडियम वरील या खेळपट्टीवर रवींद्र जडेजा यांनी कमाल केली. पहिल्या डावाप्रमाणेच रवींद्र जडेजा यांनी दुसऱ्या गावातही चार गडी बाद केले आहेत. न्यूझीलंडचा केवळ एक फलंदाज बाकी असल्याने उद्या पहिल्या टप्प्यातच भारताला फलंदाजीला यावे लागण्याची शक्यता आहे. बंगळुरुआणि पुणे येथील कसोटी मध्ये अवघ्या तीन ते चार दिवसातच निकाल स्पष्ट झाला होता त्याचीच पुनरावृत्ती आता मुंबई कसोटीत होण्याची शक्यता आहे. आज गावाची सुरुवात झाली तेव्हा शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांनी भारताच्या बाजूने किल्ला लढवला. शुभम गिल यांनी 90 धावांची खिडकी केली तर पंत 60 धावांवर बाद झाला. न्यूझीलंडच्या इजाज पटेल याने याने सर्वाधिक बळी घेतले..