खरसुंडी : खरसुंडी (ता. आटपाडी) येथे श्री सिद्धनाथ मंदिरात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गेल्या दहा दिवसापासून सुरू असलेल्या विविध कार्यक्रमात हजारो भाविकांनी सहभाग घेतला होता. आता सर्व भाविकांना उद्या, रविवारी होणाऱ्या साखर वाटप व सीमोल्लंघन सोहळ्याची उत्सुकता लागून राहिली आहे.
रविवारी सायंकाळी नगर प्रदिक्षणा सोहळा रंगणार असून, श्री सिद्धनाथाची पालखी वाजत गाजत संपूर्ण गावातून जाणार आहे.
गेले दहा दिवसापासून खरसुंडी येथे सिद्धनाथ मंदिरात व गावात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये गावासह इतर भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. आज गावात विविध कार्यक्रम झाले तर आता उद्या, रविवारी मंदिरात साखर वाटप सोहळा होणार असून सायंकाळी चिंचाळी रोड येथील मैदानावर सीमोल्लंघन सोहळा रंगणार आहे. नवरात्र उत्सवामुळे गावात उत्साहाचे वातावरण आहे.