लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई;
सांगली: इरादा न्यूज नेटवर्क
बचतगटाच्या निवीदेचे बिल काढण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच घेताना समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्ताला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. नितीन संपत उबाळे असे कारवाई झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. समाजकल्याण विभागाच्या कक्षातच ही कारवाई करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदाराच्या बचतगटाने घेतलेल्या टेंडरचे बिल मंजूर करुन देण्याच्या मोबदल्यात सहायक आयुक्त उबाळे यांनी १० टक्केप्रमाणे लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराचे आठ लाख १२ हजार रुपयांचे बिल मंजूर करायचे होते. सुरुवातीला १० टक्के मागत नंतर ५ टक्केप्रमाणे ४० हजारांच्या लाचेची मागणी करुन ती रक्कम स्विकारताना ही कारवाई करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक उमेश पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.