उमदीत जबरी चोरीतील अडीच कोटींची रोकड जप्त

0
18

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी

सांगली : उमदी (ता. जत) येथून कामानिमित्त विजयपूर येथे जाणाऱ्या एकास काठी व रॉडने मारहाण करुन जखमी करत रोख रकमेसह गाडी घेवून पसार झालेल्या टोळीस पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून तब्बल दोन कोटी ५६ लाख ३८ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

याप्रकरणी अनिल अशोक कोडग (रा. उमदी) यांनी उमदी पोलिसात फिर्याद दिली होती. पोलिसांनी कारवाई करत रवी तुकाराम सनदी, अजय तुकाराम सनदी, वेतन लक्ष्मण पवार, लालसाब हजरत होनवाड, आदिलशाह राजअहमद अत्तार, सुमित सिध्दराम माने आणि साई सिध्दू जाधव यांना ताब्यात घेतले आहे.

मंगळवार ता.१५ रोजी फिर्यादी कोडग हे कामानिमित्त विजयपूरकडे जात असताना, संशयितांनी त्यांना अडवून रोख रकमेसह गाडी घेवून ते पसार झाले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने याचा तपास सुरु करत कोत्यावबोबलाद येथे त्यांच्यावर कारवाई करत रोकड जप्त केली.

यातील साई जाधव हा कोडग यांच्याकडे कामास असल्याने त्याला ते पैसे घेवून जात असल्याची माहिती होती. संशयितांनी जबरी चोरी केल्यानंतर हा माल विजयपूर येथे ठेवला होता. पोलिसांनी तेथे जात ही रोकड जप्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here