शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी… ‘प्रधानमंत्री किसान’ चा १९ वा हप्ता मिळविण्यासाठी ३१ जानेवारीपूर्वी ‘हे’ करा…

0
26

मुंबई : इरादा न्यूज नेटवर्क

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना अधिक मदत करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्यावतीने विविध योजना राबवण्यात येत आहेत. यातच महत्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना होय. या योजनेतून आतापर्यंत १८ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.

आता १९ वा हप्ता लवकरच जमा होणार आहे. परंतू हा हप्ता जमा होण्यासाठी काही महत्त्वाची कामे शेतकऱ्यांना करावी लागणार आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांना आता शेतकरी नोंदणी आवश्यक असणार आहे. कृषी मंत्रालयाने याबाबतची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश सर्व राज्यांना दिली आहेत. डिसेंबर २०२४ पासून पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना शेतकरी म्हणून नोंदणी केल्याशिवाय दिला जाणार नाही, असा निर्णय भारत सरकारने घेतला आहे.

कोणताही शेतकरी पोर्टलवर स्वतःची नोंदणी करुन ऑनलाईन पध्दतीने शेतकरी म्हणून नोंदणी करु शकतो, यासाठी आधारकार्ड आणि ज्यावर ओटीपी येतो तो मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. शेतकरी त्यांच्या मोबाईल अॅप (फार्मर रजिस्ट्री युपी) आणि वेबपोर्टलव्दारे स्वतः ची नोंदणी करु शकतात. तसेच शेतकरी कोणत्याही सेवा केंद्रात जावूनही नोंदणी करु शकतात, यासाठी आधारकार्ड मोबाईल क्रमांकाशी लिंक असणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांनी ही नोंदणी करण्यासाठी ३१ जानेवारी ही अंतिम मुदत असल्याने ३१ जानेवारीच्या आत ही नोंदणी करावी लागणार आहे.

शेतकरी नोंदणीचे फायदे

  • पीएम किसान सन्मान निधीसाठी पात्रतेसाठी ही नोंदणी आवश्यक आहे. त्याशिवाय पुढील हप्ता मिळणार नाही.

शेतकरी नोंदणी केल्यानंतर पुन्हा पुन्हा ई-केवायसी करण्याची आवश्यकता नाही.

बँकेतून कर्ज घेतानाही या नोंदणीचा फायदा होणार आहे.

कृषी विभागाच्या सर्व योजनांमध्ये अनुदानाचा लाभही मिळणार आहे.

शेतकऱ्यांना पीक कर्ज, पीक विमा भरपाई आणि आपत्ती निवारण मिळणे सुलभ होणार आहे.

शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासही यामुळे मदत होणार आहे.

अशाच महत्त्वपूर्ण बातम्या आणि माहितीसाठी तुमच्या व्हॉटस्अॅप ग्रुपमध्ये पुढील क्रमांक समाविष्ट करा- 7058323434

‘इरादा टाईम्स’ च्या बातम्या मिळविण्यासाठी 7058323434 हा तुमच्या व्हॉटस्अॅप ग्रुपवर अॅड करुन फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकींग न्यूज मराठीत सर्वात आधी इरादा टाईम्सवर. आजच्या ताज्या बातम्या, लाईव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा मराठी न्यूज वेबसाईट इरादा टाईम्सवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here