मुंबई: अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबाबत गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले की हा ‘हा चोरीचा प्रकार होता. हल्लेखोर चोरीच्या उद्देशाने अभिनेत्याच्या घरी आला होता आणि त्याने त्याच्यावर चाकूने हल्ला केला, ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला.’ या हल्ल्यामागे कोणत्याही गुन्हेगारी टोळीचा सहभाग असल्याचे राज्यमंत्री कदम यांनी नाकारले आहे. त्यांनी सांगितले की यात अन्य कोणाचा सहभाग नाही.
सैफ अली खान घरी असताना एका हल्लेखोराने त्याच्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झालानंतर तातडीने करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेत, सैफच्या मणक्याजवळून चाकूचा तुकडा काढण्यात आला आहे. हा वार गंभीर स्वरूपाचा आहे.